Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Sangli › फसव्या भाजपला लोक थारा देणार नाहीत

फसव्या भाजपला लोक थारा देणार नाहीत

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 8:09PMसांगली : प्रतिनिधी

फसवेगिरी हाच पाया असलेल्या भाजपला सांगलीवाडीकर नागरिक महापालिका निवडणुकीत थारा देणार नाहीत, असा विश्‍वास  काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी व्यक्‍त केला. सांगलीवाडीत विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी प्रचाराचा नारळच फोडला. महापालिका सत्तेतून काँग्रेसने सांगलीवाडीला सर्वतोपरी सुविधा देऊन कायापालट केला. उलट भाजप आमदार, खासदारांनी काय दिले, असा सवालही त्यांनी केला. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक दिलीप पाटील यांनी केले होते. 

त्या म्हणाल्या, सांगलीवाडीची काँग्रेसशी नाळ घट्ट आहे. त्यामुळेच सांगलीवाडी कायम काँग्रेसच्या पाठीशी आहे. गेल्या पाच वर्षांत नगरसेवक दिलीप पाटील, पांडुरंग भिसे, सौ. वंदना कदम यांच्या माध्यमातून वाडीसाठी स्वतंत्र पाणीटाकी, सक्षम पुरवठा यंत्रणा, ड्रेनेजव्यवस्था, गावठाणसह उपनगरांमध्ये सुसज्ज डांबरी रस्ते आदी विकासकामे केली आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीतही भाजपला जनता थारा देणार नाही. सांगलीवाडीतूनच काँगे्रेसच्या तीनही उमेदवारांच्या विजयानेच काँग्रेसचे खाते खुले होईल.  यावेळी गजानन पाटील, जी. के. पवार, शामराव मगदूम, उद्योजक अशोक पवार, महाबळेश्‍वर चौगुले, सुखदेव मोहिते राजेंद्र कुंभार, छायाताई पाटील, कमल गोरे, बजरंग फडतरे उपस्थित होते.