होमपेज › Sangli › दूध पावडरला केंद्राने अनुदान द्यावे

दूध पावडरला केंद्राने अनुदान द्यावे

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 8:27PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

राज्यात दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याने दूध संस्था, पशुपालक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासाठी दूध पावडर निर्यातीवर प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले. 

राज्यात 2 कोटी लिटरपेक्षा अधिक दूध संकलन होत आहे. दूध पावडरचे जागतिक बाजारपेठेत प्रतिकिलो 250 ते 300 असणारे भाव 120 ते 160 रुपयांपर्यंत कोसळले आहे. याचा फटका दूध उत्पादक शेतकरी व दूध संस्थांना बसतो आहे. राज्य सरकारने प्रति लिटर 3 रुपयाचे अनुदान दिले आहे. यामुळे दूध दरात प्रतिलिटर 1 रुपयाचीच वाढ झाली आहे. केंद्र सरकारने कृषि ग्रामोद्योग योजनेअंतर्गत  दूध पावडर निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे. यामुळे दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. शेतकर्‍यांना व दूध संस्थांना याचा फायदा मिळेल, असे मंत्री खोत यांनी निवेदनात म्हटले आहे.