सांगली : प्रशासनाने गोरेवाडी गाव केले सील 

Last Updated: May 29 2020 2:03PM
Responsive image
गोरेवाडी (ता.खानापूर) येथे कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण गाव सीलबंद करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


विटा : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील गोरेवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गोरेवाडीसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर तालुक्यात प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यानंतर गोरेवाडी गाव हे कटेन्मेंट झोन म्हणून घोषित करत संपुर्ण गाव सीलबंद करण्यात आले. तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात बाधितांचे शतक

खानापूर तालुक्यातील पूर्वभागातील बलवडी, सुलतानगादे पाठोपाठ गोरेवाडी येथील व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह आलेली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणच्या व्यक्ती या मुंबईहुन आलेल्या आहेत. त्यामुळे घाटमाथ्यावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोरेवाडी येथील आता कोरोनाग्रस्त झालेली व्यक्ती १६ मे रोजी मुंबईहुन इकडे आलेली आहे. त्या व्यक्तीला तेव्हापासूनच होम क्वॉरंटाईन केले होते. त्याच्यासह अन्य ७ व्यक्ती घरात आहेत.

विट्याचे तहसिलदार ऋषीकेत शेळके यांनी रात्रीच प्रशासनाला अलर्ट केले होते. सर्व यंत्रणासह त्यांनी गोरेवाडी गावास भेट दिली. संबंधित पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील सातही व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यासाठी रुग्णवाहिकेने पाठवले. तसेच कटन्मेंट झोनचे बॅरेकेटिंग केले आणि आरोग्य सर्व्हेक्षण करून जंतू नाशक फवारणी बाबत आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आज गोरेवाडी येथे कटन्मेंट झोन निश्चित करून संबंधित परिसर सील करण्यात आला आहे आणि पोलिस बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे.

कडेगाव तालुक्यामध्ये १३,७०० जण होम क्वारंटाईन   

दरम्यान, खानापूर घाटमाथ्यावरील गावांत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. तशात पर जिल्ह्यातून विशेषतः मुंबई, बेलापूर, पनवेल, पुणे वगैरे अधिक कोरोनाबाधित भागातून अद्यापही लोक येत आहेत शिवाय परराज्यातील गलाई बांधवही मोठ्या संख्येने आपापल्या गावाकडे परतत आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.