Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Sangli › दोनशे पवनचक्क्या बंद पाडल्या

दोनशे पवनचक्क्या बंद पाडल्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नागज : वार्ताहर

सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांवरील 35 सुरक्षारक्षकांना कामावरून  कमी केले  आहे. संतप्त सुरक्षारक्षकांनी गेल्या आठ दिवसांपासून कामबंद आंदोलन केले आहे. कंपनीने आंदोलनाची दखल न घेतल्याने सुरक्षारक्षकांनी  कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील सुमारे दोनशे पवनचक्क्या सोमवारी बंद पाडल्या. 

पंधरा वषार्ंपूर्वी सुझलॉन कंपनीच्या अधिकार्‍यांनी तासगाव व कवठेमहांकाळ   तालुक्यातील  घाटमाथ्यावर पवनचक्क्या उभारण्यासाठी  शेतकर्‍यांची जमीन घेतली होती. त्यावेळी   अन्यायग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना सुरक्षारक्षक म्हणून  कामावर घेतले. त्यासाठी बेस्ट सिक्युरिटी कंपनीशी करार केला होता.

‘बेस्ट सिक्युरिटी’या कंपनीचा करार संपल्याने ही जबाबदारी तनीश एंटरप्रायझेस या कंपनीकडे आहे. मात्र तीन-तीन महिने सुरक्षा रक्षकांना पगार मिळत नाही अशी तक्रार आहे. कंपनीच्या 140 पैकी 35 कर्मचार्‍यांचे शिक्षण कमी असल्याचे कारण देऊन त्यांना कामावरून कमी केले आहे.

या सुरक्षारक्षकांना तत्काळ कामावर घ्यावे तसेच सुझलॉन कंपनीने तनिश इंटरप्रायझेस या कंपनीकडे दिलेली सिक्युरिटीची जबाबदारी काढून घ्यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत पवनचक्क्या बंद ठेवण्याचा इशारा सुरक्षारक्षकांनी दिला आहे.

घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, शेळकेवाडी, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर,जरंडी,दहिवडी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी सुरक्षारक्षकांच्या  आंदोलनास पाठिंबा दिला आहे.


  •