Tue, Mar 26, 2019 23:52होमपेज › Sangli › स्थायीचे अंदाजपत्रक 31 रोजी महासभेकडे

स्थायीचे अंदाजपत्रक 31 रोजी महासभेकडे

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 11:47PMसांगली : प्रतिनिधी

प्रशासनाने सादर केलेल्या 2018-19 च्या 629 कोटी रुपयांच्या  अंदाजपत्रकावर स्थायी समितीने सुधारणा करीत अंतिम केले आहे. त्यानुसार सभापती बसवेश्‍वर सातपुते हे येत्या 31 मार्चरोजी ते महासभेत महापौर हारुण शिकलगार यांच्याकडे सादर करणार आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकीय सभा बोलावण्यात आली आहे. स्थायीकडून सुमारे 60 कोटींवर भर पडल्याने हे अंदाजपत्रक सुमारे 675 कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे समजते.

प्रशासनाला यावर्षी विविध कारणांमुळे अंदाजपत्रक तयार करण्यास विलंब लागला. अखेर गेल्या मंगळवार (दि. 20) आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी ते स्थायी समितीकडे सादर केले. एकूण 629 कोटी 22 लाखांचे तर 49 लाख शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. यामध्ये जुन्या योजनांची री असल्याचे दिसून आले. परंतु स्थायी समितीने आता दोन दिवस सलग बैठका घेऊन त्यावर दुरुस्तीद्वारे शिक्‍कामोर्तब केल्याचे समजते. महापालिका निवडणूक तोंडावर  असल्याने नागरिकांसाठी नवीन योजना व नगरसेवकांची बायनेम कामांचा समावेश केला आहे. त्यानुसार त्यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांसाठी बायनेम कामांचा समावेश होणार आहे. त्यामुळे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Tags : Sangli, Sangli News, The Standing Committee, finalized budget