Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Sangli › सांगलीत पुढारी एज्यु-दिशा 2018 प्रदर्शनाचा आज प्रारंभ

सांगलीत पुढारी एज्यु-दिशा 2018 प्रदर्शनाचा आज प्रारंभ

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: Jun 01 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

करिअर निवडीच्या महत्वाच्या  टप्प्यावर विद्यार्थ्यांसह  व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी - एज्यु-दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे या शैक्षणिक प्रदर्शनाचे सांगलीत दि. 1 ते 3 जून ( शुक्रवार, शनिवार, रविवार) दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दहावीचाही लवकरच जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर पुढारी एज्युदिशा हे प्रदर्शन विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणारे आहे. 

सांगलीमध्ये कच्छी जैन सेवा समाज भवन, सांगली-मिरज रोड ( राममंदीर चौक)  येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते  प्रदर्शनाचे सकाळी 11.00 वा. उद्घाटन होत आहे. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच  तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. नामवंत शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. दहावी-बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणती शाखा निवडायची, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, शिक्षणाचे मार्ग कसे निवडावेत, शिक्षणाचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, मेडिकल, इंजिनिअरींगसोबत, कॉमर्स इतर कोणते शैक्षणिक कोर्सेस आहेत, व्यावसायिक कोर्सेस कोणते, अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे प्रदर्शनात मिळणार आहेत. या प्रदर्शनात विविध नामवंत संस्थाकडील अभ्यासक्रम व त्यातील संधी काय आहेत याची माहिती मिळणार आहे. 

पुढारी एज्युदिशामुळे विद्यार्थ्यांची उज्वल भवितव्याकडे होणारी वाटचाल अधिक सुकर होणार आहे. एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना करिअर निवड, माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. एज्युदिशा पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ( पुणे), सहयोगी प्रायोजक विश्वकर्मा विद्यापीठ, सहप्रायोजक चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ( पुणे )व सूर्यदत्ता ग्रुप ऑॅफ इन्स्टिट्यूट (पुणे) हे आहेत.

प्रदर्शनात आज होणारी व्याख्याने 

वक्ते : प्रा. डॉ. व्ही.व्ही. कुलकर्णी, विषय  : उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने,  , वेळ : 12.00 ते 1.00 .

वक्ते : प्रा. विजय नवले (पुणे), विषय : 12 वी नंतरचे करिअर, अभियांत्रिकी करिअर व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन, वेळ : 1.00 ते 2.00 .

वक्ते : सौ. सई ठाकूर (कोल्हापूर), विषय : बायोटेक्नॉलॉजी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, वेळ : 5.00 ते 6.00 .

वक्ते : हर्षद ठाकूर ( कोल्हापूर), विषय : विदेशातील करिअरच्या संधी, वेळ : 6.00 ते 7.00.