Sat, Nov 17, 2018 05:46होमपेज › Sangli › म्हैसाळ योजनेसाठी कोयना, वारणेतून विसर्ग

म्हैसाळ योजनेसाठी कोयना, वारणेतून विसर्ग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंगनूर : वार्ताहर

म्हैसाळ योजना सुरू होऊन पाचच दिवस झाले आहेत. मात्र सध्या कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्याने म्हैसाळ योजनेचे सर्व पंप सुरू करता येईनासे झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी दुपारपासून कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दुसरीकडे  मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात वीजबिल वसुली देणार्‍या लाभक्षेत्रात शाखा कालवे सुरू केले जात आहेत. त्यामुळे दुपारपासून पाणी कमी पडू लागले. मात्र पंपांची संख्या वाढविता येत नसल्याने अखेर वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन  कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला, अशी माहिती पाटबंधारे  खात्यातर्फे देण्यात आली.आजपासून कोयना आणि वारणा दोन्ही धरणातून विसर्ग सुरू केल्याने शनिवारपर्यंत कृष्णापात्रात पाणी वाढेल असा अंदाज आहे.

दोन दिवसांत पाणी क्षमतेने पाणी पोहोचले, की पुन्हा सर्वच पाचही टप्प्यातून पंप संख्या वाढविता येणार आहे.तसेच बुधवारी शिंदेवाडी आणि परिसरात शाखा कालवे सुरू करण्यावरुन खात्याचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात वाद झाला होता. पण खात्याने स्पष्ट केलेल्या भूमिकेनुसार शासनाच्या नव्या 81 - 19 चा फॉर्म्युला याच आवर्तनात लागू करण्यात येत आहे. त्यामुळे 19 टक्के वीजबिल आणि किमान पाणीपट्टी मिळून 1200 रुपये एकरी भरले तर शाखा कालवे त्या भागात सुरू केले जात आहेत. 

त्यामुळे   शिंदेवाडी हद्दीत गेट क्रमांक 11, 12 व 13 आज पैसे भरल्यानंतरच सुरू करण्यात आले. या गेटवरून पाणी दिले जाणार्‍या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी 1 लाख 65 हजार रुपये गोळा करून दिले आहेत.दरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील काही  गेटवर हस्तक्षेप दिसून येऊ लागला. त्यामुळे खात्यानेच निर्णय घेत जेसीबीने गेट मुरूम भरून बंद करून टाकले आहेत. म्हैसाळच्या वसुलीची उसळी म्हैसाळचे आवर्तन सुरू होण्यापूर्वी दोन अडीच महिन्यात केवळ तीन लाख रुपयांची वसुली झाली होती. आता  एकरी फक्त 1200 रुपयांचा आकडा जाहीर होताच वसुलीने आज चांगलीच उसळी घेतली आहे. वसुलीस चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

Tags : Sangli, Sangli News, Mhaisal scheme, started, five days, ago


  •