Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Sangli › ठाणापुडे तलाव पशुधनाला वरदान

ठाणापुडे तलाव पशुधनाला वरदान

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 7:37PMऐतवडे बुद्रूक : वार्ताहर

विहिरींची वाढती संख्या, पावसाचे घटते प्रमाण, बागायती क्षेत्रातील वाढ आदी कारणांनी विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. पण वाळवा तालुक्यातील ठाणापुडेतील तलावातील पाण्याने मात्र पशुधनाच्या पाण्याचा व स्वच्छतेबाबत ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

वारणा पट्ट्यात पशुधनाच्या पाण्याचा व चार्‍याचा प्रश्‍न गंभीर आहे. अनेक गावात लहान-मोठे तळे, तलाव, बंधारे आहेत. पण पाण्याची पातळी खालावत आहे. काही बंधारे कोरडे पडले आहेत. पण ठाणापुडे येथे या तलावाने पाणीसाठ्याची देणगीच दिली आहे. सुमारे 2 हजार 500 लोकसंख्या असणार्‍या गावात घरटी दोन-तीन जनावरे आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्‍न  भेडसावतो. मात्र या तलावातील पाण्याने ग्रामस्थांना दिलासा दिला असल्याचे सरपंच मनीषा पाटील यांनी सागितले. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी 2 कोटींहून जादा निधी मिळण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक  यांच्याकडे  पाठपुरावा सुरू असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले. 

पाणी योजनांत पशुधनाचा समावेश आवश्यक...

शासन भारत निर्माण,  पेयजल, जलस्वराज्य आदीं पाणी योजनांचे आराखडे तयार करून ग्रामीण भागात या योजना राबवत आहेत. बहुसंख्य  योजनांचे काम सुरू आहे. तर काही अंतिम टप्प्यात आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. प्रत्येक जनावरासाठी दररोज 40 ते 45 लिटर तर स्वच्छतेसाठी 40 लिटर पाण्याची गरज आहे. यासाठी शासनाने पशुधनाचा आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी प्रा. डी. एम. पाटील यांनी केली.