Thu, Mar 21, 2019 11:22होमपेज › Sangli › भाजप मेळाव्यासाठी जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते रवाना

भाजप मेळाव्यासाठी जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते रवाना

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 8:25PMसांगली : प्रतिनिधी

भाजपच्या स्थापनादिनानिमित्त मुंबईत शुक्रवारी होणार्‍या मेळाव्यास सांगली जिल्ह्यातून 10 हजाराहून अधिक कार्यकर्ते रवाना झाले. काहीजण खासगी वाहनांद्वारे  तर काहीजणांनी रेल्वेचा मार्ग पकडला. यासाठी कोल्हापूरहून स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. 

मुंबईत शुक्रवारी भाजपचा स्थापनादिनानिमित्त मेळावा होत  आहे. त्यासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते  येणार आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते, मिळेल त्या वाहनाने मुंबईला रवाना झाले.स्थानिक नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिकांचे सदस्य कार्यकर्त्यांसमवेत मुंबईला रवाना झाले. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्यावतीने  कोल्हापूरहून रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. या रेल्वेने हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. सांगली जिल्ह्यातून सुमारे 10 हजाराहून अधिक कार्यकर्ते रवाना झाल्याचे भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

.खासदार संजय पाटील हे मुंबईतच होते. शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुरेश खाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी  गुरुवारी दुपारी मुंबईला रवाना झाले. सांमिकु महापालिका आणि लगतच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा मेळावा होत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने काय संदेश दिला जातो, याला अधिक महत्त्व आहे.

Tags :