Thu, Jul 18, 2019 02:51होमपेज › Sangli › टेम्पो उलटून वीस जखमी, तिघे गंभीर

टेम्पो उलटून वीस जखमी, तिघे गंभीर

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

अंकली (ता. मिरज) येथे रेल्वे कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो चालकाचा ताबा सुटून उलटला. यामध्ये टेम्पोतील वीस कामगार जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर चालक पळून गेला आहे. रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरू होते. 

सरोजबाई सुखराम वनवासी (वय 20), ओमप्रकाश मोलीराम परस्ते (वय 25), सावित्रीबाई देवा मंगल सरैय्या (वय 35) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर कुलदीपकुमार उत्तमसिंग शैर्य (वय 19), भगतराम परस्ते (वय 60), ध्रुवपाल मानसिंग यादव (वय 18), मायावती परस्ते (वय 19), कुमार रामवती परस्ते (वय 19), सुमित्राबाई (वय 18, सर्व रा. चांदराणी, जि. दिंडोरी, मध्यप्रदेश) अशी यातील अन्य जखमींची नावे आहेत. अन्य अकराजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. 

मिरजेतील अशोक नामक मुकादमाकडे हे सर्वजण काम करतात. गेल्या आठ दिवसांपासून ते मिरजेत रहात आहेत. बुधवारी सकाळी रेल्वे रूळाचे काम करण्यासाठी वीसजण टेम्पोमधून रूकडी (जि. कोल्हापूर) येथे गेले होते. तेथील काम संपल्यानंतर त्याच टेम्पोमधून ते परत येत होते. अंकलीजवळ टेम्पो आल्यानंतर चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यानंतर गाडी रस्त्यावरच उलटली. यामध्ये आतील सर्व वीसहीजण जखमी झाले. 

अपघातानंतर सर्व जखमींना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अकराजणांवर उपचार करून सोडून देण्यात आले. तर अन्य जखमींवर अद्याप उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.