Fri, Jul 19, 2019 23:15होमपेज › Sangli › हलगर्जीपणाबद्दल पलूसचे नायब तहसीलदार निलंबित 

हलगर्जीपणाबद्दल पलूसचे नायब तहसीलदार निलंबित 

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 11:14PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूसचे  नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी निलंबित केले.

माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. देशमुख यांनी नायब तहसीलदार मोरे यांच्याकडे वाहतूक आराखडा तयार करणे, तसेच खासगी वाहने अधिग्रहण करणे, निवडणुकीसाठी लागणारे ई.व्ही.एम.एल.सी.करणे आदी कामे सोपवली होती; परंतु मोरे यांनी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही.

वारंवार  सांगूनही त्यांनी नेमून दिलेल्या कामात दिरंगाई केली. दि. 5 मेपासून ते निवडणूक कामावर हजरही राहिले नाहीत. त्यामुळे डॉ.देशमुख यांनी त्यांना निलंबित केले आहे.