Sun, Jun 16, 2019 08:10होमपेज › Sangli › विजेच्या धक्क्याने शिक्षकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शिक्षकाचा मृत्यू

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
नागज : वार्ताहर

नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील शिवाजी नारायण भोसले (वय 51) यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू  झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी रायवाडी येथे घडली.  शेतात विहिरीवरील मोटारीची पेटी उघडताना त्यांना विजेचा तीव्र धक्‍का बसला. त्यात त्यांचा जागीच  मृत्यू  झाला. ते घरी का परतले नाहीत, हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा पंकज शेतात गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पळशी येथील विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.