Fri, Mar 22, 2019 08:09होमपेज › Sangli › विसापूर पुणदी योजना तत्काळ सुरू करा :आ. सुमन पाटील 

विसापूर पुणदी योजना तत्काळ सुरू करा :आ. सुमन पाटील 

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 12:21AM

बुकमार्क करा

तासगाव  : प्रतिनिधी 

तासगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर तात्काळ विसापूर- पुणदी उपसा सिंचन योजना सुरु करण्यात यावी,अशी मागणी आमदार सुमन पाटील यांनी निवेदनाद्वारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, पुर्वभागातील गावांना आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. विसापूर पुणदी उपसा सिंचन योजना सुरु केल्यास या गावांचा पाणीप्रश्‍न निकाली निघणार आहे.

पाणी मागण्यांसाठी आरफळ कालव्यात लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ तालुक्यातील शेतकर्‍यांवर येते, ही दुर्दैवी गोष्ट आहे.आता तरी सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी. तालुक्यातील सावर्डे, लोढे, डोर्ली, आरवडे, कौलगे गावातील शेतकर्‍यांनी लोकवर्गणी काढून पाटबंधारे विभागाकडे पैसे जमा केले आहेत. भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे. पाणी सोडून लोढे तलाव भरुन घेणे गरजेचे आहे. तरी यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश अधिका-यांना देण्यात यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.