होमपेज › Sangli › खरीप हंगामासाठी तासगाव तालुका सज्ज

खरीप हंगामासाठी तासगाव तालुका सज्ज

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 8:30PMतासगाव : प्रतिनिधी 

तासगाव तालुक्यात मान्सून वेळेवर दाखल झाला आहे. मशागती पूर्ण केलेले शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहेत. यंदा अंदाजे 46 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. अशी माहिती तालुका कृषि अधिकारी राजाराम शिंदे यांनी दिली.शिंदे म्हणाले,  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामी पिकांचा पेरा वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तूर, मूग, उडीद व रबी हंगामातील पिकातही वाढ होण्याची शक्यता आहे. 

कृषि विभागामार्फत शाश्‍वत शेती तसेच विविध योजना व उपक्रम कार्यान्वित केले आहेत. कृषि विभागाकडून खरीप पीक लागवडीबाबत मार्गदर्शन सुरू आहे. कृषि केंद्रात  तूर, मूग, उडीद व इतर पिकांच्या विविध वाणांचे बियाणे उपलब्ध होऊ लागले आहे. जमीन आरोग्य तपासणी उपक्रमाअंतर्गत कृषी विभाग विनामूल्य माती परीक्षण करुन देणार आहे. तालुक्यातील 69 गावांमधील 5 हजार 900 शेतकर्‍यांचे माती नमुने परीक्षणासाठी घेतले आहेत.