Fri, Jan 18, 2019 07:17



होमपेज › Sangli › महावितरणच्या निषेधार्थ सावळजमध्ये बंद

महावितरणच्या निषेधार्थ सावळजमध्ये बंद

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 9:06PM

बुकमार्क करा





तासगाव : प्रतिनिधी 

सावळज (ता. तासगाव) येथील महावितरणच्या कार्यालयाला शेतकर्‍यांनी टाळे ठोकल्यानंतर माजी उपसरपंच अनिल थोरात यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा निषेध म्हणून शुक्रवारी सावळजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, दुकानदारांनी व्यवहार बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभागी झाले.

बुधवारी सकाळी माजी सरपंच हेमंत पाटील, अनिल थोरात, अनिल शिंदे, तुकाराम माळी, संजय माळी, निलेश माळी, अनिल माळी, महादेव भडके, बाबू बुधवले, बाबू माळी, ईश्‍वरा माळी, चंद्रकांत माळी, विनोद कोळी यांच्यासह शंभर शेतकर्‍यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. 

याप्रकरणी महावितरणच्या अधिकार्‍यांनी फिर्याद दिल्यानंतर माजी उपसरपंच अनिल थोरात यांच्या विरोधात तासगाव पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा निषेध म्हणून शेतकर्‍यांनी  हा बंद पुकारला होता. यावेळी गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.