Fri, May 24, 2019 09:17होमपेज › Sangli › ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी न केल्याने डोंगरसोनीत वादंग

ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी न केल्याने डोंगरसोनीत वादंग

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:30PMतासगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील डोंगरसोनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी न केल्याच्या कारणावरुन वादंग निर्माण झाले. या मुद्यावरुन ग्रामस्थांनी ग्रामसेवक टी. पी. कांबळे यांना धारेवर धरले असता त्यांनी उलट उत्तरे दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. परिणामी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या दिलाा. 

याप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी विजय काळम - पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ग्रामसेवक कांबळे यांना निलंबित करण्याची आणि सरपंच, उपसरपंच यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवप्रेमींनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. गावात काही काळ तणाव निर्माण झाला. ग्रामसेवक, उपसरपंच व कर्मचार्‍यांनी माफी मागून घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

या अर्जावर गुलाब सूर्यवंशी, दिनकर पाटील, परशुराम झांबरे, संजय झांबरे, सचिन झांबरे, युवराज झांबरे, अनिल झांबरे, निवास मोहिते, प्रथमेश पाटील, तेजस पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.