Wed, Jul 17, 2019 00:36होमपेज › Sangli › तासगाव तालुक्यात 30 छावणी चालकांवर गुन्हा

तासगाव तालुक्यात 30 छावणी चालकांवर गुन्हा

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 12:20AMतासगाव: प्रतिनिधी  

तासगाव तालुक्यातील  अनियमितता आढळून आलेल्या 33 पैकी 30 चारा छावण्यांच्या चालकांवर गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले.  छावण्या चालवताना अनियमितता आढळून आलेल्या 33 संस्था काळ्या यादीत टाकून 30 संस्था चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली  होती. त्यानंतरही  छावणीतील अनियमिततेला आळा बसला नाही. ही बाब  तपासणीदरम्यान निदर्शनास आली होती.  त्यामुळे याप्रकरणी दोषी असलेल्या चारा छावणी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी  विजयकुमार काळम - पाटील यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  दिले होते.

त्यानुसार तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनी तालुक्यातील 30 चारा छावणी चालकांविरोधात फिर्याद देण्याचे आदेश निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना दिले होते. ढाले यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 30 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झालेले चालक असे ः बाबासाहेब आप्पासाहेब पाटील (अध्यक्ष: चैतन्य विकास सोसायटी, पेड ), पंढरीनाथ भगवान मोहित (अध्यक्ष: कापूर अग्रणी मिल्क, मांजर्डे), दादासाहेब सुबराव शेंडगे (अध्यक्ष:  मल्हारराव विकास सोसायटी, पेड), महादेव शामराव पाटील  (अध्यक्ष: श्रीनाथ विकास सोसायटी, आरवडे, अध्यक्ष: श्रीनाथ विकास सोसायटी, डोर्ली), विश्‍वनाथ तुकाराम जाधव (अध्यक्ष: सुभाष विकास सोसायटी, विजयनगर), कांतीलाल

गणपती कोरेे (अध्यक्ष: बलगवडे विकास सोसायटी, बलगवडे), तुकाराम पांडुरंग पाटील (अध्यक्ष: हनुमान सर्व सेवा सोसायटी, लोढे), दिनकर पांडुरंग जाधव (अध्यक्ष: सिद्धेश्‍वर सर्व सेवा सोसायटी, नरसेवाडी), संभाजी सुबराव पाटील(अध्यक्ष: पुणदी सर्व सेवा सोसायटी, पुणदी), विठोबा प्रल्हाद दगडे (अध्यक्ष: गौरगाव सर्व सेवा सोसायटी, गौरगाव).
 अनिल विश्‍वास पाटील (माजी सभापती: कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव), शहाजी वसंत पाटील(अध्यक्ष: बस्तवडे सर्व सेवा सोसायटी, बस्तवडे), सतीश वसंत झांबरे (अध्यक्ष: डोंगरसोनी सर्व सेवा सोसायटी, डोंगरसोनी), बबन लक्ष्मण बाबर (अध्यक्ष: ब्रम्हनाथ विकास सोसायटी, लोकरेवाडी), हणमंत भानुदास मोरे (अध्यक्ष: बलभीम सर्व सेवा सोसायटी, जरंडी), यशवंत भानुदास मोरे (अध्यक्ष: बिरणवाडी सर्व सेवा सोसायटी, बिरणवाडी).

 मोहन आबा यमगर (अध्यक्ष: अहिल्यादेवी विकास सोसायटी, यमगरवाडी), शिवाजी केशव जाधव (अध्यक्ष: हनुमान सर्व सेवा सोसायटी, दहीवडी),  महादेव विलास पाटील(अध्यक्ष: सिद्धेश्‍वर विकास सेवा सोसायटी, उपळावी), संजय राजाराम यादवे (अध्यक्ष: वज्रेश्‍वर मजूर सहकारी सेवा सोसायटी, वज्रचौंडे), रावसाहेब पाटील (अध्यक्ष: अण्णासाहेब मजूर सेवा सोसायटी, खुजगाव), रघुनाथ सदाशिव पाटील (अध्यक्ष: कौलगे ग्राम सहकारी संस्था, कौलगे), दिलीप दत्तात्रय पाटील (अध्यक्ष: सिद्धेश्‍वर विकास सोसायटी आणि जयभवानी विज्ञान कृषी मंडळ, सावर्डे), भीमराव विश्‍वनाथ पाटील (अध्यक्ष: होनाईदेवी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, हातनूर).

 पांडुरंग दत्तात्रय खुजट(अध्यक्ष: गोटेवाडी विकास सोसायटी, गोटेवाडी), विजय छगन इंगळे (अध्यक्ष: खा. धामणी श्री सिद्धेश्‍वर सर्व सहकारी सोसायटी, धामणी), अतुल भूपाल जाधव (अध्यक्ष: जनता दूध उत्पादक व व्यवसाय संस्था, कुमठे), रंगराव भिवा मान (अध्यक्ष: संजयकाका सर्व सेवा संस्था, भैरववाडी), हारुण खुदबुद्दीन मुजावर (अध्यक्ष: दसरा मजूर सोसायटी, कवठेएकंद).