Mon, May 27, 2019 07:11होमपेज › Sangli › चिंचणीत दोन गटांत राडा 

चिंचणीत दोन गटांत राडा 

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:18AMतासगाव : प्रतिनिधी 

 तालुक्यातील चिंचणी येथे   शुक्रवारी (दि. 19) दुपारी दोन गटात जोरदार राडा झाला. या मारामारीत एकजण गंभीर जखमी झाला.  तीन ग्रामपंचायत सदस्यांना जखमी झाले  आहेत. तसेच एक ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकलींची तोडफोड झाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप दाखल नाही. गेल्या अनेक वर्षांपासून गावात वर्चस्ववादातून छुप्या पद्धतीने धुसफूस सुरू आहे. यापूर्वी बर्‍याच वेळा दोन गटांत वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाला आहे. याच वादातून शुक्रवारी दुपारी दोन्ही गट परस्परांंना भिडले. 

दोनशे ते अडीचशे तरुण काठ्या, दगड व दांडकी घेऊन एकमेकांशी भिडले. एस.टी. स्टॅन्ड चौकातच हा प्रकार झाल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. या मारामारीत एकजण गंभीर जखमी झाला. तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यही जखमी झाले आहेत. याशिवाय तरुणांनी ट्रॅक्टर आणि मोटरसायकलची तोडफोड केली आहे. घटनेची मिळताच पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, उपनिरीक्षक दंडीले यांच्यासह फौजफाटा चिंचणीकडे पाठविला. यानंतर परिस्थिती निवळली. जखमी तरुणावर तासगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे गावात रात्री उशिरापर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता.