Tue, Jul 16, 2019 10:04होमपेज › Sangli › तासगावमध्ये दुसर्‍या दिवशी घरफोडी

तासगावमध्ये दुसर्‍या दिवशी घरफोडी

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:30PM

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव शहरात सलग दुसर्‍या दिवशी अज्ञात चोरट्यांनी तीन घरे आणि एक मोठे दुकान फोडल्याची घटना घडली. यामध्ये रोख रकमेसह तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याबाबत तासगाव पोलिसांत उशिरा नोंद करण्यात आली.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गौरीशंकर नावाचे किराणा दुकान आहे. मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास मालक शिवशंकर शेटे हे दुकान बंद करुन घरी गेले. यानंतर चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे मागच्या बाजूचे शटर व दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील 1 लाख रुपये किंमतीचे संगणकाचे साहित्य, पाच हजार रुपयांची चांदीची नाणी व पंधरा हजार रुपये रोख लंपास करण्यात आले. 

दत्तमाळ परिसरातील सरस्वतीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडली. यामध्ये   दहा हजार रुपये रोख व साठ हजार रुपयांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. ही तीनही घरे बंद होती.