Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Sangli ›

तासगावात भाजपतर्फे पोलिसांचा निषेध; बंद

तासगावात भाजपतर्फे पोलिसांचा निषेध; बंद

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 1:57AMतासगाव : प्रतिनिधी/ शहर प्रतिनिधी 

माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या निषेधार्थ बुधवारी भाजपने शहर बंदचे आवाहन केले होते. तसेच शर्मा यांची तत्काळ बदली करावी, या मागणीसाठी बुधवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी  तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले.  नायब तहसीलदार सुनील ढाले यांना मागणीचे निवेदन दिले. सोमवारी रात्री येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत तुफान मारामारी झाली.

त्यावेळी काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, पक्षप्रतोद अनिल कुत्ते, बाळासाहेब गुजर यांच्यासह 70 ते 80 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी खासदार समर्थकांनी आज शहर बंद ठेवून धरणे आंदोलन केले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बाबासाहेब पाटील फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी न पाठवता पोलिस अधीक्षक येईपर्यंत थांबवून ठेवले. पोलिस अधीक्षक आल्यानंतर त्यांनी  शिवीगाळ करून मारहाण केली.  खासदार पाटील आणि भाजपला बदनाम करण्यासाठी पोलिस  अधीक्षक  सुडबुद्धीने कारवाई करीत आहेत.

यावेळी  नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे, सुखदेव पाटील, पतंगराव पाटील, सुनील पाटील, चंद्रकांत कदम, बळवंत चव्हाण, आर. पी. खराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान खासदार पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
 

 

 

 

tags ; Tasgaon,news,Superintendent,Police, suhayl ,Sharma, protest,