Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Sangli › जलसंधारणासाठी आमदार सुमनताईंचे श्रमदान

जलसंधारणासाठी आमदार सुमनताईंचे श्रमदान

Published On: Feb 07 2018 1:36AM | Last Updated: Feb 06 2018 10:04PMतासगाव : प्रतिनिधी  

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप 2018 स्पर्धेत सहभागी झालेल्या सावळज (ता.तासगाव) येथील ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांनी श्रमदान केले. 
जलक्रांतीच्या या चळवळीचे साक्षीदार होण्यासाठी तरुण पिढीने गट-तट विसरून एकजुटीने दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी आमदार पाटील यांनी केले. सावळज येथे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरुण पिढी एकत्रित येऊन कामाला लागली आहे.

वॉटरकप स्पर्धेचा भाग म्हणून 35 हजार रोपांची रोपवाटिका बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रोज पहाटे दोन तास याप्रमाणे गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी यासाठी श्रमदान करत आहेत.
सावळजकर ग्रामस्थांचा उत्साह व कामाची चिकाटी पाहून आमदार सुमनताई पाटील या रोपवाटिका तयार करण्याच्या ठिकाणी आल्या. तरुण आणि वृद्धांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्वत: श्रमदान केले. श्रमदानासाठी उपस्थित गावकर्‍यांचे कौतुक केले.