Sat, Feb 23, 2019 12:11होमपेज › Sangli › तंटामुक्त गाव विकासाची दिशा : पाटील

तंटामुक्त गाव विकासाची दिशा : पाटील

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 8:25PMबोरगाव : वार्ताहर

तंटामुक्त गाव हीच विकासाची दिशा आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य जितेंद्र पाटील यांनी केले.बोरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसचिवालयात महात्मा गांधी तंटामुक्त समिती कार्यालय उघडण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच जयंती मालोजी पाटील या होत्या. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष रणधीर पाटील, आ. गो. पाटील, के.जी. पाटील, प्रा. के. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, तंटामुक्ती समितीचे सदस्य, बिरोबा सोसायटीचे अध्यक्ष हिंदुराव वाटेगावकर, उपाध्यक्ष लालासाहेब शिंदे, माजी सदस्य महादेव पाटील, शंकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच प्रमोद शिंदे यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई यांनी आभार मानले.