Thu, Jul 18, 2019 16:42होमपेज › Sangli › कुंडलमध्ये तलाठ्यांना धक्काबुक्की

कुंडलमध्ये तलाठ्यांना धक्काबुक्की

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:17PMकुंडल : वार्ताहर

येथील तलाठी निहाल अत्तार यांना धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणला  आणि  डंपर चालक अमोल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल अ‍ॅट्रासिटीअंतर्गत दोघांवर कुंडल पोलिसात गुन्हा दाखल झाला. 

कुंडल पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : कुंडल बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामावर मुरुम उतरवला जात होता. त्या  डंपरचालकाकडे वैभव लक्ष्मण पवार व राजाराम विठ्ठल पवार यांनी मुरुम वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली.

तलाठी अत्तार यांनी दोघांनाही चालकाकडील मुरुम वाहतुकीचा परवाना दाखविला. तरीही त्या दोघांनी शिवीगाळ केली. वैभव पवार याने फिर्यादी अत्तार यांच्या हातातील परवाना हिसकावून घेऊन फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच  त्यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वैभव पवार, राजाराम पवार यांच्या  विरोधात कुंडल पोलिसात  गुन्हा दाखल झाला आहे. 

डंपर चालक  अमोल दिलीप कांबळे (वय 25 ) यांना जातीवाचक शिविगाळ करुन, तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. अशी  फिर्याद वरील दोन संशयितांविरोधात अमोल कांबळे यांनी दिली आहे.