Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Sangli › चार लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार

चार लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 11:21PMमिरज : शहर प्रतिनिधी 

येथील सराफ महेश सूर्यकांत शहा यांचे चार लाख रुपये किमतीचे सोने घेऊन कारागीर सूरजअली रफीकअली शेख (वय 21, रा. काटापूर, पश्‍चिम बंगाल) हा फरार झाला आहे. याबाबत शहर पोलिसांनी त्या करागीराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत निजामुद्दीन जलालुद्दीन शेख (रा. शनिवार पेठ, मिरज) यांनी तक्रार दिली आहे. निजामुद्दीन यांच्या घराच्या तिसर्‍या मजल्यावर सोन्याचे दागिने तयार केले जातात. येथील सराफ महेश शहा यांच्याकडून 144 ग्रॅमचे सोने नेकलेस बनवण्यासाठी निजामुद्दीन शेख यांनी घेतले होते. 

शेख यांनी नेकलेस तयार करण्यासाठी ते सोने त्यांच्याकडील कारागीर सूरजअली शेख याला दिले होते. ते सोने घेऊन कारागीर सूरजअली हा शनिवार दुपारपासून गायब झाला आहे. तो ते सोने घेऊन फरार झाल्याचे समजल्यानंतर निजामुद्दीन यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्या कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.