Mon, Aug 19, 2019 05:36होमपेज › Sangli › महापालिकेत हल्ला करणार्‍यांवर कारवाई करा

महापालिकेत हल्ला करणार्‍यांवर कारवाई करा

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि त्यांच्या सहकार्‍यांवर हल्ला करणार्‍यांवर कडक कारवाई करून या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. नितीन चव्हाण, विलास देसाई, जयदीप पाटील, सतीश खांबे, डॉ. संजय पाटील आदिंनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की वरिष्ठांच्या आदेशाने काम करणार्‍या अधिकार्‍यांना शासकीय कार्यालयात घुसून मारहाण करणे हे निंदनीय व चिंताजनक आहे. संबंधितांना शासकीय खर्चाने पोलिस संरक्षण देण्यात यावे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कोणत्याही दबावास बळी न पडता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. काहीजण हेतुपुरस्सर या प्रकरणास जातीय वळण देऊ पाहत आहेत. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार दहशत माजवण्याचा असल्याची मराठा समाजाची धारणा होत आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी, अन्यथा पुढील आंदोलनाची जबाबदारी प्रशासन आणि राज्य सरकारची राहील. 

Tags : Sangli, Take action, against the attackers, municipal corporation, Sangli news,