होमपेज › Sangli › ताकारी-टेंभूच्या आवर्तनाने कडेगाव घाटमाथ्याला दिलासा

ताकारी-टेंभूच्या आवर्तनाने कडेगाव घाटमाथ्याला दिलासा

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 8:17PM



कडेगाव : संदीप पाटील

कडेगाव, खानापूर तालुक्याला वरदान ठरणार्‍या ताकारी व टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू झाल्याने घाटमाथ्यावरील शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच दिलासा मिळतो आहे. गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. त्याचदरम्यान, काही दिवसांपासून तालुक्यात शेती, पिण्याच्या पाण्याचा  गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. 

तालुक्यात अनेक गावातील विहिरी, बंधारे, तलाव त्याचप्रमाणे येरळा नदीचे पात्र अक्षरशः कोरडे ठणठणीत पडले आहे. काही वर्षांपासून तालुक्यात ताकारी व टेंभू योजनेचे पाणी आले आहे. याचा शेतीला चांगलाच फायदा झाला आहे. ताकारीच्या पाण्यामुळे तालुक्यात उसासह भाजीपाला तसेच अन्य पिकांची शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र सध्या ही पिके जगवायची कशी, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर होता. हातातोंडाला आलेली पिके वाळत असताना शेतकरी धास्तावला होता. मात्र, आता  ताकारी व टेंभूचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र पाण्याभावी ऊस वाळू लागला आहे. यामुळे उसाच्या वजनात मोठीच घट येऊ लागली आहे.  त्याचा फटका शेतकर्‍यांना  बसत आहे. 

Tags : sangli, sangli news, Takaari-Temb issue, Kadegaon,