Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Sangli › डॉ.आंबेडकर, सावरकर यांचे विचार समतेचे

डॉ.आंबेडकर, सावरकर यांचे विचार समतेचे

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:59PMसांगली : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनीही  देशाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या विचारात अनेक साम्य स्थळे होती आणि समता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असा सूर आज येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात उमटला. 

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीतील जाती पड्यालचा भारत’ या विषयावरील परिसंवादात खासदार अमर साबळे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर, रवींद्र गोळे  हे सहभागी झाले होते. 

खासदार साबळे म्हणाले, सावरकर आणि डॉ. आंबेडकर या दोघांनीही आंतरजातीय विवाह, समता  प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. या दोघांचाही काँग्रेसच्या नेत्यांनी मानसिक छळ केला. तोरसेकर म्हणाले, सध्या समाजात जाणीवपूर्वक दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ.आंबेडकरांचे विचार पुसून टाकण्याचे काम सुरू आहे.  

मालकर म्हणाले, हितसंबंध आड येतात तेव्हा जात बाहेर काढली जाते. अजूनही आपण जाती पलिकडे गेलो नाही. संपत्तीची वितरण व्यवस्था तयार होत नाही, तोपर्यंत जात संपणार नाही. रोजगाराची  सुरक्षितता दिली जाणे गरजेचे आहे.   अद्यापही 30 ते 40 टक्के लोक दारिद्य्रात आहेत. विषमतेमुळेच लाचारी आणि मुजोरी सहन करावी लागते. अर्थकरणाने समाजातील विषमता दूर होऊ शकते. 

गोळे म्हणाले, समाजाला एका पातळीवर आणण्याचे प्रयत्न दोघांनीही केले. कायद्याने जात संपली असली तरीही अनेकांच्या मनात जात अद्यापही आहे. बंधुभाव हाच धर्म असून ते जपणे गरजेचे आहे. 

Tags : sangli, Swatantryaveer Savarkar, Sahitya Sammelan, sangli news,