Sun, Feb 17, 2019 13:49होमपेज › Sangli › स्वाभिमानी लोकसभेच्या सहा जागा लढविणार

स्वाभिमानी लोकसभेच्या सहा जागा लढविणार

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 10:15PMसांगली : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांना दिली. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य असणार्‍यांबरोबरच आघाडी केली जाईल, असेही ते म्हणाले. भाजपने शेतकर्‍यांचा मोठा विश्‍वासघात केल्याची टीकाही त्यांनी केली.ते म्हणाले, संघटना  हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, वर्धा याठिकाणी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. त्याची तयारी आम्ही केली आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य असलेल्या राजकीय पक्षांबरोबर आघाडी केली जाईल. भाजपनेे शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला आहे.  कर्जमुक्ती, दीडपट हमीभावासाठी देशातील 193 संघटनांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. हे विधेयक लोकसभेत मी व राज्यसभेत के. रगिया मांडणार आहोत. या विधेयकांना पाठिंबा देणार्‍यांबरोबर आम्ही आघाडी करू. सांगली महापालिकेसाठी कोणबरोबर आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायची याबाबत चर्चा सुरू आहे. पण  काही जागा लढविण्याचे आम्ही निश्‍चित केले आहे. यावेळी महेश  खराडे, सयाजी मोरे, संजय खोलकुंबे, महावीर   पाटील, जयकुमार कोले, संदीप राजोबा, संदीप चौगुले, कुमार पाटील, संजय बेले, बी.आर. पाटील उपस्थित होते. 

सहकार मंत्र्यांनी आधी दर द्यावा, मग बोलावे

शेट्टी म्हणाले, यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरु करण्यास  सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. पण त्यांनी आधी स्वत:च्या साखर कारखान्याचा दर द्यावा, मग बोलावे. तसेच त्यांनी राज्य बँक, जिल्हा बँकांना साखरचे मुल्याकंन वाढविण्याचा आदेश द्यावा.