Wed, Jul 17, 2019 11:01होमपेज › Sangli › ठरल्याप्रमाणे ऊस दराचे पैसे द्या; अन्यथा आंदोलन

ठरल्याप्रमाणे ऊस दराचे पैसे द्या; अन्यथा आंदोलन

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

साखर कारखानदारांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. ठरल्याप्रमाणेच कारखान्यांना ऊस दराचे पैसे द्यावे लागतील;  अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिला. 

ते म्हणाले, साखरचे दर कमी होण्यास शेतकरी जबाबदार नाहीत. त्यामुळे त्याला त्यांच्या हक्‍काची रक्‍कम मिळालीच पाहिजे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात मध्यस्थी करून हा दर आणि पैसे ठरवले होते. त्यामुळे हे पैसे देण्याबाबत सरकारचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. यासंदर्भात आमचे शिष्टमंडळ दोन दिवसात ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. दराबाबत सरकारची काय भूमिका आहे, याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्या विरोधातही आंदोलन छेडण्यात येईल. संसदेचे अधिवेशन आठवडाभरानंतर संपल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.