Wed, Sep 19, 2018 09:29



होमपेज › Sangli › कोथळे कुटुंबीयांचे उपोषण स्थगित

कोथळे कुटुंबीयांचे उपोषण स्थगित

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 11 2017 8:58PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे याच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्याबाबत  पालकमंत्री सुभाष देशमुख आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी फोनवरून आश्‍वासन दिल्यानंतर कोथळे कुटुंबीयांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील व पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी, अशी मागणी आहे. त्यासंदर्भात  अनिकेतची पत्नी संध्या, वडील अशोक, आई आलका, भाऊ  अशिष व अमित आदी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.  या ठिकाणी कृती समितीचे समीत कदम, सतीश साखळकर, महेश खराडे आदी आले. त्यांनी जिल्हाधिकारी काळम-पाटील आणि अधीक्षक शर्मा यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर कोथळे कुटुंबीयांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेऊन त्यांचा पालकमंत्री देशमुख आणि आमदार गाडगीळ यांच्याशी संपर्क करून दिला. या दोघा नेत्यांनीही आम्ही तुमच्या 
दुःखात सहभागी आहोत.  तुमच्या बहुतेक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. शासकीय नोकरी देण्याची मागणीही आम्ही पूर्ण करू, असे आश्‍वासन दिले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांच्याहस्ते सरबत देऊन हे उपोषण सोडण्यात आले.