होमपेज › Sangli › पंचवीस वर्षे फरारी संशयितास अटक

पंचवीस वर्षे फरारी संशयितास अटक

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jul 01 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

वाळवा येथे गंभीर गुन्ह्यात घराचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात 1993 पासून फरारी असलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. नझीर मेहबूब मुजावर (वय 69, रा. पेठभाग, वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एका गंभीर गुन्ह्यात घराचा दुरूपयोग केल्याप्रकरणी नझीर मुजावरवर 1993 मध्ये इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी होता.शनिवारी तो वाळव्यातील त्याच्या घरात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

पथकाने वाळवा येथील त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कदम, अशोक डगळे, अझर पिरजादे आदींनी ही कारवाई केली.