Sat, Nov 17, 2018 09:58होमपेज › Sangli › ५२ लाख क्विं. साखरेचे उत्पादन

५२ लाख क्विं. साखरेचे उत्पादन

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 8:39PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील गळीत हंगामाने आता चांगलीच गती घेतली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये 44 लाख 50 हजार मे. टन उसाचे गाळप तर 51 लाख 73 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा हा 11.63 टक्के राहिला आहे.  अर्थात  बहुसंख्य साखर कारखान्यांकडे शेतकर्‍यांची डिसेंबरपासूनची ऊस बिले थकली आहेत. 

मात्र यावेळी गेल्या तीन आठवड्यापूर्वीपेक्षा साखर उतारा घटला आहे. उतार्‍यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटने 12.22 टक्के साखर उतारा मिळवित उतार्‍यात आघाडीचे स्थान पटकावले आहे. गाळपात  साखराळे  युनिटने 5 लाख 5000 मे. टन गाळपाने आघाडी घेतली आहे. 

चालू गळीत हंगामाच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना अपुर्‍या तोडणी यंत्रणेचे आव्हान राहिले आहे. तर साखरेचे  दर घसरल्याने ऊसउत्पादकांची बिले कारखान्यांकडे  लटकली आहेत.