होमपेज › Sangli › विषय शिक्षकांना नव्या आदेशानुसार  वेतनश्रेणी द्या 

विषय शिक्षकांना नव्या आदेशानुसार  वेतनश्रेणी द्या 

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेने ऑगस्ट 2014 मध्ये पदोन्नती दिलेल्या विषय शिक्षकांना दि. 14 नोव्हेंबर 2017 च्या नवीन शासन आदेशानुसार विषय निहाय 33 टक्के विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव यांनी केली आहे. 

शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांना निवेदन दिले. विनायक शिंदे, अविनाश गुरव, हंबीरराव पवार, तानाजीराव खोत, किरण सोहनी, कृष्णा तेरवे, शब्बीर तांबोळी, प्रकाश जाधव उपस्थित होते. 

शासनाच्या दि. 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन आदेशानुसार पदोन्नती देताना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठता यादी विषय संवर्गनिहाय ठेवून या यादीप्रमाणे विषयातील ज्येष्ठतेनुसार प्रत्येक विषयाच्या 33 टक्के विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. शासन आदेशात तसा स्पष्ट उल्लेख आहे. या आदेशामुळे विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा रखडलेला प्रश्‍न सुटणार 
आहे. 

याबाबत शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक मत नोंदवले. सन 2007 पूर्वीच्या शिक्षणसेवकांचा परिविक्षाधिन कालावधी मंजुरीसाठी पत्र कोणताही प्रस्ताव न देता या आठवड्यात मंजुर करण्याचे आश्‍वासन शिक्षणाधिकारी वाघमोडेे यांनी दिले.