Thu, Jul 18, 2019 00:16होमपेज › Sangli › जत तालुक्यात विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचित

जत तालुक्यात विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचित

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:19PMयेळवी : विजय रुपनूर

जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. मात्र  यावर्षी   शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणारा गणवेश शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापि मिळालेला नाही.गणवेशाच्या बाबतीत काहीच हालचाली शासनाकडून होताना दिसत नाही. त्यामुळे  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील  विद्यार्थी  अद्यापही गणवेशापासून वंचितआहेत.

तालुक्यात मोठ्या  प्रमाणात  शिक्षकाची व शिक्षण  विभागातील   पदे रिक्त आहेत. समानिकरणामुळे जत तालुक्यात  जिल्हा  परिषद शाळेत  शिक्षक  कमी  झाल्याने एका शिक्षकास  शिक्षणाची जाबबदारी दिली आहे.   ही परिस्थिती  अनेक शाळेत आहे. यामुळेच अनेक पालकांनी विद्यार्थी खासगी शाळेत  घातले आहेत. 

जिल्हा परिषद शाळा आणि नगरपरिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत गणवेश पुरविण्यात येतो. सर्व  मुला- मुलींना  हा लाभ दिला जातो.  एकावेळी दोन गणवेश पुरवले जात असल्याने वर्षभर गणवेश खरेदीची समस्या पुन्हा पालकांना येत नाही.  

शासनाने शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश पुरविणे बंद केले. जुन्या पध्दतीने गणवेश पुरविणे बंद करून विद्यार्थ्यांना त्यांची बँक खाती राष्ट्रीयकृत बँकेत काढायला लाऊन गणवेशाची रक्कम या खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी मुख्याध्याकांवर सोपवली होती. पालकांनी हे पैसे वापरून विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करायचे होते.

यावर्षी शासन मुलांना गणवेश देणार आहे की नाही, याचे  संकेत मात्र मिळत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.  नवीन गणवेश घालून शाळेत जाण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर पाणी पडले आहे. पालकांनाही गणवेश विकत घेऊन द्यावे की, शासनाकडून दिले जाणार, या संभ्रमात पालक सापडले आहेत. 

पालकांमध्ये संभ्रम

हा महत्त्वाचा प्रकल्प गेल्यावर्षी राज्यातील शाळांत यशस्वीपणे राबिण्यात आला. यावर्षी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांची गणवेश खरेदीतून सुटका झाली आहे. यावर्षी गणवेश मिळणार का नाही, याबाबत पालकांना व शिक्षकांना काहीच माहिती नाही. शिक्षकांना यावेळी प्रशासनाने काही कळवले नाही. त्यामुळेच त्यांनाही पालकांना व विद्यार्थ्यांना काहीच सांगता येत नाही.