Fri, Nov 16, 2018 23:39होमपेज › Sangli › येळापूरचा विद्यार्थी अपघातात ठार

येळापूरचा विद्यार्थी अपघातात ठार

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 17 2017 12:32AM

बुकमार्क करा

कोकरूड : वार्ताहर

शिराळा तालुक्यातील चव्हाणवाडी येथे शनिवारी सायंकाळी ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थी आशिष अशोक पवार (वय 11, रा. येळापूर, ता. शिराळा) हा जागीच ठार झाला. ट्रॅक्टरचालक राकेशकुमार गुप्‍तीयार (26) हा गंभीर जखमी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद कोकरूड पोलिसांत झाली नव्हती. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः आज दिवसभर येळापूर डोंगरावर दगडाचे उत्खनन सुरू होते.  चालक राकेशकुमार दगडाने भरलेले डंपर व ट्रॅक्टर घेऊन चव्हाणवाडीकडे येत होता. त्याच्या बाजूस आशिष हा बसला होता. दरम्यान, चव्हाणवाडी येथील वळणावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली आशिष सापडल्याने तो जागीच ठार झाला. चालक राकेशकुमार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.