Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Sangli › सांगली : नापास होण्याच्या भितीने विद्यार्थ्याची आत्महत्या

सांगली : नापास होण्याच्या भितीने विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: May 30 2018 1:21PM | Last Updated: May 30 2018 1:21PMसांगली : प्रतिनिधी

कर्नाळ (ता. मिरज)  येथे बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने एका युवकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. प्रणव दूष्यंत माने (वय 18) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगलीतील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात बारावीत वाणिज्य शाखेत शिकत होता. आज बारावीचा ऑनलाईन निकाल होता. निकलापूर्वीच प्रणव सकाळी साडेआठच्या सुमारास घरातून गेला होता. साडेनऊच्या सुमारास कर्नाळ- बिसूर दरम्यान रेल्वेखाली उडी मारून त्याने आत्महत्या केली.  तो आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ यांच्यासोबत राहत होता. प्रणवच्या आत्महत्येमुळे कर्नाळ गावावर शोककळा पसरली आहे.