होमपेज › Sangli › सांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक (Video)

सांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक (Video)

Published On: Jan 03 2018 2:13PM | Last Updated: Jan 03 2018 4:59PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करत जमावाने मारुती चौकात लावण्यात आलेल्या संभाजी भिडे डिजीटल फलकावर दगडफेक केली. तसेच जमावाने चौकात ठिय्या मारल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

शिवप्रतिषठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि हिंदू जनजागरण समितीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर हिंसाचार घडवून आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात लावलेलला फलक काढून टाकण्याची मागणी करत चौकात आंदोलकांनी ठिय्या मारला. अखर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने फलक काढला त्यावेळीच दगडफेक करण्यात आली. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह कार्यकत्यांनी शांततेचे आवाहन केले.