Wed, Apr 24, 2019 11:35होमपेज › Sangli › सांगलीत फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍याविरुद्ध चोरीचा गुन्हा

सांगलीत फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍याविरुद्ध चोरीचा गुन्हा

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 8:43PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

थकीत हप्ते भरूनही एका फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकार्‍यांनी जबरदस्तीने वाहन ओढून नेल्याप्रकरणी त्या अधिकार्‍यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहन मालकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. पैसे भरूनही वाहन परत न केल्याने संजयनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लालासाहेब गायकवाड आणि दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक हिम्मत काटे (रा. आरवाडे पार्क, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. काटे यांनी 2015 मध्ये त्यांच्या छोटा हत्ती या वाहनावर एका फायनान्स कंपनीकडून वाहन तारण कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना 24 महिन्यांची मुदत देण्यात आली होती.