Thu, Jul 16, 2020 00:06होमपेज › Sangli › राज्यात आघाडी; महापालिकेबाबत जयंतराव ठरवतील

राज्यात आघाडी; महापालिकेबाबत जयंतराव ठरवतील

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यात समविचारी पक्षांसोबत आघाडी होईल, असे राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, सांगली महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होणार काय, या प्रश्‍नावर पवार म्हणाले, त्याबाबत जयंत पाटील निर्णय घेतील. ते ठरवतील. गरज असेल तर ते प्रदेश राष्ट्रवादीशी चर्चा करतील. 

पवार म्हणाले, जातीयवादी भाजपचा पराभव करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी सर्व समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न राहील.सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व अन्य समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादी आघाडी करणार काय, या प्रश्‍नावर अजित पवार म्हणाले, सांगली महापालिकेच्या निवडणुकीबाबतचे सर्व निर्णय पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील हे घेतील. त्यांना गरज भासली तर ते प्रदेश राष्ट्रवादीशी चर्चा करतील. 

सांगली महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीमध्ये असलेल्या गटबाजीकडे लक्ष वेधले असता अजित पवार म्हणाले, मी व सुनील तटकरे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.  दोन्ही बाजुंकडून म्हणणे आलेले आहे. या सर्वांचाच विचार केला जाईल. प्रत्येक व्यक्तीत कमी-जास्त ताकद असते. मात्र आम्ही नेहमीच बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. महापालिका क्षेत्रात पक्षात काही वाद असतील तर पक्षाचे नेते जयंत पाटील त्यावर निर्णय घेतील. जयंत पाटील यांच्याशी त्याबाबत चर्चा होईल. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, युवक राष्ट्रवादीचे राहुल पवार, सागर घोडके, नगरसेवक विष्णू माने, पद्माकर जगदाळे व नगरसेवक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Tags : Sangli, State leadership, Jayantrao Patil, decide, Municipal Corporation