Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Sangli › चरखोदाईवरून स्थायी सभेत गदारोळ

चरखोदाईवरून स्थायी सभेत गदारोळ

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 11:43PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरात चरखोदाईतील अनागोंदी कारभाराबद्दल सोमवारी तहकूब स्थायी समिती सभेत गदारोळ झाला. कंपन्या रस्तेखोदाईस परवानगी घेतात. मात्र केबल टाकून रस्ते तसेच पडतात. याबद्दल जाब विचारायचा, असा सवाल सदस्यांनी केला. यासंदर्भात सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. ते म्हणाले, शहरात पॅचवर्कचे ठेकेदार निश्‍चित झाल्याशिवाय केबल खोदाईस परवानगी देऊ नये. अन्यथा  संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करू.

दरम्यान, शहरात सार्वजनिक बांधकाम तसेच महापालिकेमार्फत मंजूर दुबार रस्ते कामांवरून प्रशासनाला धारेवर धरले. गढूळ पाणी, विश्रामबागच्या हॉटेल चिनारचे अतिक्रमण विषयावरून वादळी चर्चा झाली. सर्वच सदस्यांनी केबल कंपन्यांनी परस्पर चर खोदाई केल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला. यावर अधिकार्‍यांनी आयुक्तांचे आदेश आहेत, असे स्पष्ट केले. दिलीप पाटील म्हणाले, वर्षभरापूर्वी सांगलीवाडीत 30 लाख रूपये खर्च करून रस्ता केला होता. तो उकरायचा उद्योग प्रशासनाने परस्पर सुरू केला होता. यासाठी मोबाईल केबल कंपनीने 15 कामगार लावले होते. या रस्त्यांच्या खाली जलवाहिन्या, पाण्याच्या टाकीच्या मुख्य वाहिन्या आहेत. तरीही ही परवानगी दिलीच कशी? 

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत आम्हाला अडचणीत आणायचा उद्योग प्रशासन करते आहे. शिवराज बोळाज म्हणाले, टिळक चौक, मारुती रोड वरही चर खोदाई केली आहे. तेथेही अधिकारी सांगतात आयुक्तांचे आदेश आहेत. आमदार फंडातून हे रस्ते होणार, असे अधिकारी सांगत आहेत. ही कामे होणार कधी?