Fri, Apr 19, 2019 12:43होमपेज › Sangli › आष्ट्यात मराठी हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्ट्यात मराठी हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : शहर वार्ताहर

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व येथील सरगम ग्रुप हमारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आष्टा येथील श्रीराम हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इस्लामपूर शहरातील संगीतप्रेमी, इंजिनिअर, डॉक्टर, वकील, उद्योजक, व्यापारी, कमर्शिअल आर्टीस्ट आदी हौसी कलाकारांनी हा ग्रुप बनविला असून त्यांनी अनेक ठिकाणी  कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे. 

‘सत्यम शिवम् सुंदरम्’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली. देखा ना हाय रे सोचाना, छुप गये सारे नजारे, दिल की बात, चुरा लिया है, गाता रहे मेरा दिल, बाहो मे चले आओ, सामने ये कौन आया आदी जुन्या हिंदी गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. निसर्गराजा, काय गं सखू, अश्‍विनी ये ना या मराठी गाण्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  दिसला गं बाई दिसला ही ठसकेबाज लावणी कलाकारांनी अप्रतिम सादर केली. कार्यक्रमात महिलांनी टाळ्या वाजवून दाद दिली.  

कार्यक्रमाला कस्तुरी सभासदांसह त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्या हस्ते झाले. माजी नगराध्यक्ष झिनत आत्तार, नगरसेविका पुष्पलता माळी, सारिका मदने, मनिषा जाधव, माजी नगरसेवक सतिश माळी,  नितीन झंवर, सुनिता घोरपडे, वैशाली साळुंखे आदी उपस्थित होते. 

Tags : Sangli, Sangli News, Spontaneous, response, Marathi, Hindi, Songs, program,  Ashta


  •