Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Sangli › महामोर्चा यशस्वीतेसाठी पोलिसांचे सहकार्य

महामोर्चा यशस्वीतेसाठी पोलिसांचे सहकार्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगलीत 3 डिसेंबररोजी होणार्‍या लिंगायत महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी चोख बंदोस्त ठेवून पोलिस यंत्रणा सहकार्य करेल, असे आश्‍वासन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्‍त केले. अखिल भारतीय लिंगायत समन्य समितीने श्री. नांगरे-पाटील यांना  मोर्चासंदर्भात नियोजन आणि परवानगीसाठी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. नांगरे-पाटील यांनी अधीक्षक सुहेश शर्मा यांना समितीशी चर्चेद्वारे काटेकोर नियोजनाचे आदेश दिले.

याप्रसंगी लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, शिक्षकनेते विश्‍वनाथ मिरजकर, संचालक सुशील हडदरे, अशोक पाटील, रवींद्र केंपवाडे आदी उपस्थित होते.

सिंहासने म्हणाले, मोर्चासाठी मोठ्या संख्येने लोक सांगलीत येणार आहेत. त्यादृष्टीने पार्किंग, मोर्चाचा मार्ग, स्टेजपासून सर्वच नियोजन काटेकोर व्हावे यादृष्टीने तयारी करावी लागेल, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर होणार्‍या मोर्चासाठी चोख बंदोबस्त, ज्या-त्या मार्गावर पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासह आरोग्य व्यवस्थेचीही तयारी करावी लागेल. मोर्चासाठी बाहेर गावाहून येणार्‍या समाजबांधवांना त्रास होऊ नये. भोजन, पाण्यासह स्वच्छतेचीही व्यवस्था करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. 

यासाठी पोलिस प्रशासनाबरोबरच महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांनाही नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी समन्वय समितीच्या प्रमुखांच्या सहकार्याने बैठक घ्यावी.