Thu, Aug 22, 2019 08:13होमपेज › Sangli › सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू : ठाकरे

सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू : ठाकरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत  कोथळे खूनप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू. विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचीच नियुक्‍ती करण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोथळे यांच्या कुटुंबियांना दिले. सांगली मुक्कामी कुटुंबियांची त्यांनी भेटीदरम्यान चौकशी केली. यावेळी अनिकेतच्या मुलीच्या नावे एक लाख रुपयांची ठेव ठेवून त्याचे प्रमाणपत्र श्री. ठाकरे यांनी कुटुंबाकडे सुपूर्त केले.

श्री. ठाकरे म्हणाले, पोसिल ठाण्यात गुंडांचा बडेजाव केला जातो. मात्र गोरगरिबांना नाडण्याचा प्रकार काही नवा नाही. अनिकेतसारख्या तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचा खून केला, हा प्रकार भयावह आहे. यावेळी अनिकेतचा भाऊ आशिष यांनी एकूणच पोलिस आणि सीआयडी तपासातील लपवाछपवीचा पाढा वाचला. वरिष्ठांच्या बदल्या करून अभय दिल्याची तक्रारही केली. यावर श्री. ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करण्यास भाग पाडू, असे आश्‍वासन दिले. यावेळी नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, पृथ्वीराज पवार यांच्यासह कोथळे यांचे कुटुंबिय उपस्थित होते.