Thu, Apr 25, 2019 04:00होमपेज › Sangli › ‘सोनहिरा’स  सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार प्रदान

‘सोनहिरा’स  सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार प्रदान

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:38PM

बुकमार्क करा

कडेगाव : शहर प्रतिनिधी

सोनहिरा साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्सिट्यूटतर्फे वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार मंगळवारी प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय  मंत्री  शरद पवार यांच्या हस्ते सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विशाल पाटील सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज कदम, कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते.

आमदार कदम म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  आत्तापर्यंतचे सर्व हंगाम यशस्वीपणे पार पाडले आहेत. अल्पावधीत कारखान्याने गरुड झेप घेऊन राज्यातील नामांकित कारखान्यांत स्थान मिळवले आहे. या सर्व यशस्वी वाटचालीमध्ये  सभासद शेतकर्‍यांचा कारखान्यावरील असणारा विश्वास तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग मोलाचा आहे.