Thu, Mar 21, 2019 15:47होमपेज › Sangli › एमआयडीसीतील प्रश्‍न तातडीने सोडवा

एमआयडीसीतील प्रश्‍न तातडीने सोडवा

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:00PMसांगली : प्रतिनिधी

सांगली मिरज आणि कुपवाड परिसरातील अनेक प्रश्‍न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. ते सोेडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटी यांनी आज येथे दिले.

जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे, सहाय्यक कामगार आयुक्त मोहन सोनार, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका  विद्या  कुलकर्णी, सांगली - मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅली असोसिएशनचे शिवाजी पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष संतोष भावे  उपस्थित होते.

मिरज एमआयडीसीमध्ये फायर स्टेशन सुरू करणे, कुपवाड एम.आय.डी.सी.मधील वृक्षारोपणासाठी दिलेले खुले प्लॉट परत घेऊन छोट्या उद्योजकांना देणे, सांडपाणी प्रकल्प व्यवस्थापन, मिरज एम.आय.डी.सी. क्षेत्रात रस्त्यावर गतिरोधक करणे, मिरज एम.आय.डी.सी. मधील खोक्यांचे अतिक्रमण काढणे  आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर   संबंधितांना सूचना देऊन कामाचा अहवाल  देण्यास सांगण्यात आले.जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कोळेकर यांनी बैठकीत विषय सादर केले.