होमपेज › Sangli › ‘सोनहिरा देशात पहिला’ ही पतंगरावांची स्वप्नपूर्ती : आ. मोहनराव कदम

‘सोनहिरा देशात पहिला’ ही पतंगरावांची स्वप्नपूर्ती : आ. मोहनराव कदम

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 7:10PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

माझा सोनहिरा सहकारी साखर कारखाना एक दिवस देशात पहिला येईल, असे माजी मंत्री (स्व.) आमदार डॉ. पतंगराव कदम नेहमी सांगत. राष्ट्रीय साखर  संघाने  सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर केला. त्यामुळे डॉ. कदम यांची स्वप्नपूर्ती झाली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी केले.

कारखान्यास पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्यावतीने   अध्यक्ष  कदम यांचा सत्कार झाला. त्यावेळी ते  बोलत होते. आ. कदम   म्हणाले , डॉ.  कदम यांनी दुष्काळी व दुर्गम भागात या कारखान्याची उभारणी केली. ताकारी आणि टेंभू सिंचन योजनांचे पाणी आणले  आणि येथील चित्र पालटले. योग्य नियोजन केल्यामुळे कारखान्याने अल्पावधीत यशाचे शिखर गाठले. उत्कृष्ट प्रशासन, अभ्यासू अधिकारीवर्ग, कुशल कामगार  आणि सभासद  शेतकर्‍यांची विश्‍वासार्हता यामुळे कारखान्याने प्रगतीकडे वाटचाल केली आहे. 

उपाध्यक्ष सयाजीराव धनवडे, कार्यकारी संचालक शरद कदम, संचालक उपस्थित होते. शरद कदम म्हणाले, आमदार कदम यांचे मार्गदर्शन आणि  संस्थापक माजी मंत्री (स्व.) डॉ. कदम यांच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी करण्यासाठी कारखाना सदैव कटिबध्द राहील.