Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Sangli › तर आम्हीही अटक करून घेऊ

तर आम्हीही अटक करून घेऊ

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 24 2018 12:31AMसांगली : प्रतिनिधी

संभाजीराव भिडे त्यागी आहेत. त्यांच्यावर केलेले दंगलीचे आरोप चुकीचे आहेत. त्यांच्याबद्दल वापरली जाणारी अरे-तुरेची भाषा खपवून घेतली जाणार नाही. जर त्यांना अटक केली तर आम्हीही स्वतःला अटक करून घेऊ, असा इशारा महिलांनी दिला. संभाजीराव भिडे सन्मान महामोर्चातर्फे आयोजित महिलांच्या बैठकीत हा सूर उमटला. यावेळी उषा बापट म्हणाल्या, दंगलीवेळी भिडे गुरूजी कासेगाव येथे होते. हे माहीत असतानाही तिथे उपस्थित नेते गप्प का आहेत? भिडे हे हिंदू धर्मासाठी काम करीत आहेत.  

यासाठी त्यांच्या सन्मानार्थ दि. 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची दखल शासनाने घेतली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आम्ही भेटू. प्रसंगी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आम्ही आमच्या मागण्या मांडू, असेही बापट यावेळी म्हणाल्या. यावेळी रागिणी वेलणकर, प्रतिभा पाटील, कमल माळी, हेमांगी बापट, शैलजा गोगटे, नितीन चौगुले, सचिन पवार, श्रीकृष्ण माळी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

Tags : Sangli, Sangli News, will get arrested