Sat, Jul 20, 2019 02:40होमपेज › Sangli › सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा

सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:37AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने सहाजण जखमी झाले. यामध्ये वाहतूक पोलिसासह एक मुलगा, दोन युवक व दोन नागरिकांचा समावेश आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांनी महापालिकेला कळविल्यानंतर डॉग स्कॉडकडून पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात आले. 

यामध्ये वाहतूक पोलिस विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय 42, रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ), दत्ता शिवाजी घागरे (40, रा. ढालगाव), मनोज महावीर  पाटील (20, रा. नांद्रे), किशन हरिकिशन ठक्कर (55, रा. रतनशीनगर, सांगली), राजाराम हिम्मतराम घाची (28, रा. टिंबर एरिया, सांगली), अजित राजू करांडे (14, रा. वखारभाग, सांगली) जखमी झाले आहेत. रविवार असल्याने कॉलेज कॉर्नर परिसरात गर्दी कमी होती. वाहतूक पोलिस कोळेकर या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. त्यावेळी माधवनगर रस्त्याकडून पिसाळलेले

एक कुत्रे कॉलेज कॉर्नर परिसरात आले. त्यावेळी त्याने पहिल्यांदा कोळेकर यांचा चावा घेतला. त्यानंतर दिसेल त्याचा चावा घेत कुत्रे निघाले. या कुत्र्याने सहाजणांचा चावा घेतला. यामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती नागरिकांनी देताच महापालिकेचे डॉगस्कॉड घटनास्थळी आले. त्यांनी कुत्र्याला पकडले. त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.