Wed, Mar 27, 2019 02:00होमपेज › Sangli › जमावाच्या सशस्त्र हल्ल्यात सहा जखमी

जमावाच्या सशस्त्र हल्ल्यात सहा जखमी

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 11 2017 12:03AM

बुकमार्क करा

आष्टा : प्रतिनिधी

हॉटेलमधील जेवणाची उधारी मागून वादावादी केली या कारणावरून कारंदवाडी ( ता.वाळवा ) येथे रविवारी सकाळी खुनी हल्ला करण्यात आला. पाच मोटारसायकलवरून आलेल्या जमावाने घरात घुसून तलवार, कोयता,लोखंडी रॉड व काठ्यांनी केलेल्या  हल्ल्यात दोन महिलांसह सहाजण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात तीन तरुणांची डोकी फुटली आहेत. एकाच्या हाताचे बोट मोडले आहे. पाय फॅक्‍चर झाला आहे. महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे.

मनोज तात्यासाहेब वग्याणी (वय 30), प्रतीक नितीन पाटील (वय 20), सुमित राजेंद्र वाडकर (वय 25) व सौ. सुनंदा नितीन पाटील (वय 45) अशी  जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर आष्टा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. राजेंद्र नाभिराज वाडकर (वय 50) व संजय वाडकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर आष्टा ग्रामीण रुणालयात उपचार करण्यात आले.

आष्टा पोलिसांनी हिंमत पाटील,किरण पाटील,उदय पाटील,सुरेश उर्फ पिंटू पाटील,बंडा उत्तुरे,शशिकांत उर्फ सोन्या उत्तुरे,वैभव पाटील,बजरंग कामिरे,विकास नेमाणे व 7 ते 8 अनोळखी व्यक्ती, सर्व रा.कारंदवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

प्रतीक नितीन पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडून  व आष्टा पोलिसांकडून मिळालेली  माहिती अशी  ःकारंदवाडी येथे  मनोज तात्यासाहेब वग्याणी यांचा ढाबा आहे.एक महिन्यापूर्वी जेवणाचे 300 रूपये बिल देण्याच्या कारणावरून मनोज वग्याणी व बंडा उत्तुरे यांच्यामध्ये मारामारी झाली होती. तो वाद हिंमत पाटील व किरण पाटील यांनी मिटविला होता.

परंतु त्याचवेळी अमित दीपक वग्याणी याने भांडण मिटविण्यासाठी आलेल्या हिंमत पाटीलची कॉलर पकडल्यामुळे हिंमतने त्याला मारहाण केली होती.यानंतर गावातील काही प्रतिष्ठित  लोकांनी मध्यस्थी करून तो वाद मिटविला होता.परंतु तरीही दोन्ही गटातील तरूणांमध्ये  वाद धुमसत होता. भांडण वाढायला नको म्हणून फिर्यादी गटाच्या लोकांना घरच्या लोकांनी एक महिना बाहेरगावी ठेवले होते.चार दिवसांपूर्वी सर्वजण कारंदवाडीत परत आले होते.

दरम्यान रविवारी सकाळी  10 वाजण्याच्या सुमारास  सुमित व त्याचे वडील राजेंद्र नाभिराज वाडकर यांना जयंत कॉलनी (वाडकर मळा) येथील घरात घूसून हिंमत पाटील,किरण पाटील,सोन्या व बंडू उत्तुरे,विकास नेमाणे,बजरंग कामिरे,वैभव पाटील,उदय पाटील ,सुरेश पाटील व अनोळखी7  ते 8 जणांनी मारहाण केली. सुमितच्या डोक्यात कोयत्याचा वार झाला आहे. हात फॅक्‍चर झाला आहे. त्याच्या वडिलांना लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे.

यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल पंपाजवळील प्रतिक नितीन पाटील व त्याची आई सौ.सुनंदा  यांना घरात घुसून बेदम मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून मनोज  वग्याणी बाहेर आला. तेव्हा त्याला व त्याची आई पद्मजा वग्याणी यांना घरात घूसून मारहाण करण्यात आली.  मनोजच्या डोक्यात तलवारीचा वार झाला आहे. हात फॅ्रक्‍चर झाला आहे. त्यानंतर सर्वजण चेतन आप्पासाहेब वाडकर याला मारण्यासाठी गेले होते परंतु तो बाहेरगावी गेल्यामुळे बचावला.

या घटनेनंतर  गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.उपविभागीय पोलसि अधिकारी किशोर काळे यांनी घटनास्थळी भेट दिली .  पोलिस निरीक्षक मिलींद पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.