Fri, Jan 18, 2019 17:21होमपेज › Sangli › येळापूरजवळ अपघातात शिरसटवाडीचा युवक ठार 

येळापूरजवळ अपघातात शिरसटवाडीचा युवक ठार 

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 05 2018 11:33PMकोकरूड : वार्ताहर 

येळापूर (ता.शिराळा)  येथील वळणावर लक्झरी बस  (एम. एच.04. 5414)  व मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाली. सोमवारी दुपारी  झालेल्या या अपघातात शिरसटवाडी येथील स्वप्नील वसंत शिरसट (वय 24) या युवकाचा मृत्यू झाला. कोकरूड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. 

कोकरूड पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी समजलेली माहिती अशी : लक्झरी  बस  कराडकडून शेडगेवाडी कडे जात होती. स्वप्निल शिरसट शेडगेवाडीकडून गावी जात होता. येळापूर येथील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.  स्वप्नीलच्या  डोक्याला जबरदस्त मार बसल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. स्वप्नील याला कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज उबाळे अधिक तपास करीत आहेत.